कायदा पाळणे प्रत्येकाची जबाबदारी : न्या. कुलकर्णी

सिन्नर महाविद्यालयात कायदेविषयक कार्यशाळा
कायदा पाळणे प्रत्येकाची जबाबदारी : न्या. कुलकर्णी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)म्हणतात की, कायद्यापुढे सर्व समान आहेत. सर्वांना समान हक्क आणि अधिकार कायद्यामुळे मिळतात. कायद्याचे पालन करणे हे आदर्श समाजाचे प्रतीक आहे. कायदाविषयक साक्षरता आणि कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश आर. आर. कुलकर्णी (Civil Judge R. R. Kulkarni)यांनी केले.

सिन्नर महाविद्यालयात ( Sinnar College )जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ व गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पॅन इंडिया, कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कुलकर्णी बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. अण्णासाहेब सोनवणे, अ‍ॅड. शिवराज नवले, प्रा. आर. के. मुंगसे, निवृत्ती आव्हाड, संगीता चौधरी उपस्थित होते. मानवी जीवन सुखी व समाधानी होण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेले हत्यार म्हणजे कायदा. कायदेविषयक निरक्षरता असणे म्हणजे समाजाचे मोठे नुकसान आहे. म्हणूनच देशाचे भावी नागरिक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायदे विषयक साक्षर करणे गरजेचे आहे.

शासन व सर्वसामान्य नागरिक यांमध्ये समन्वय साधणारी प्रभावी यंत्रणा म्हणजे कायदा आहे. भारतीय संविधानानुसार न्यायव्यवस्था ही सर्वोच्च असल्याचे कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. कायदा हा सर्वांसाठी सारखाच हवा. सर्वांसाठी समान कायदा हे रामराज्याचे आदर्श मूलतत्व होते. आज समाजातील भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, अराजकता व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे स्वयंस्फूर्तीने कठोर पालन करणे गरजेचे आहे. असे झाले तर आजही रामराज्य येणे शक्य आहे. त्यासाठी सर्वप्रथम कायदे विषयक जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. रसाळ यांनी दिली. प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन उपप्राचार्य आर. व्ही. पवार यांनी केले. आभार डॉ. सी. ई. गुरुळे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com