मराठा आरक्षणामुळे ओबीसींनी विचलित होउ नये

छगन भुजबळ : मराठा आरक्षणाला विरोध नाही
मराठा आरक्षणामुळे ओबीसींनी विचलित होउ नये
USER

नाशिक । Nashik

छत्रपती संभाजी महाराज हे राजे असून आम्ही शाहू, फुले व आंबेडकर यांचे भक्त आहोत.

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुटणार असल्याने अोबीसींनी विचलित होण्याची गरज नाही, या शब्दात अन्नपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाजाला आश्वस्त केले.

भुजबळ फार्म येथे शुक्रवारी (दि.११)पत्रकारांशी संवाद साधत आरक्षणासह विविध मुद्यांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

करोनाचा पार्श्वभूमीवर कसं आंदोलन करावं हे आम्ही काय सांगणार. पण संभाजीराजे यांची पावलं सावध आहेत.इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी ते घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता प्रशांत किशोर हे राजकिय पक्षांना यश मिळविण्याचे सल्ले देतात.त्यांचा निवडणूक विषयात हातखंडा आहे. त्यांनी काही सल्ला दिला तर पवार साहेब नक्की ऐकतील असे मत भुजबळ यांनी मांडले.

तसेच शिवसेनेने भाजपविरुद्ध मवाळ भूमिका घेतली का ? असे विचारले असता राज्याच्या अनेक प्रश्नांचं उत्तर केंद्राकडे असते. त्यामुळे जमवून घ्यावच लागतं.मात्र मैत्री करायची हे वाघाच्या मनावर असुन वाघ पंजाही मारू शकतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

बाळासाहेबांनी स्वत:चे नाव नाकारले असते

बाळासाहेब ठाकरे असते तर विमानतळाला स्वतःचं नाव नाकारलं असतं. त्यांनी जे.आर. डी टाटा नाव द्या असं सांगितलं असत. नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा. बाळासाहेब आणि दि. बा. पाटील या दोघांच्याही नावाला आमचा पाठिंबा असल्याचे भुजबळ म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com