सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये. मराठा समाजाला आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा संपुर्ण पाठिंबा राहिल. येणार्या काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणा संदर्भात कृती समिती व समता परिषदतर्फे महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात येणार असल्याचा निर्धार या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.

सातपूर परिसरातील ओबीसी समाज बांधव आरक्षण बचाव कृती समितीची बैठक श्रमिक नगर येथे संपन्न झाली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक शहर व आरक्षण बचाव कृती समितिची बैठक पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर येथे (दि. २१) संपन्न झाली. सदर बैठकीचे आयोजन ओबीसी बचाव कृती समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदतर्फे करण्यात आले होते.

यावेळी योगेश कमोद, सदाशिव माळी, समाधान जेजुरकर, श्रीराम मंडळ, हर्षल सोनवणे, जिवन अहिरे, प्रकाश महाजन, गोविंद माळी, मच्छींद्र माळी, भारत जाधव, किरण भिवसने, आण्णा साहे जावळे, अनिल माळी, दिपक चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सर्वानुमते आरक्षणाच्या मुद्यावर कोणताही विरोध न करता आपले आरक्षण अबाधित राखण्यासाठी संघटितपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीला सुनिल देवरे, हनुमान सोनवणे, अमोल महाजन, रविंद्र महाजन, गुला माळी, कविश्वर पाटील, ज्ञानेश्वर महाजन, संजय महाजन, गोरख गांगुर्डे, सावता सैंदाणे ओबीसी बांधव व समता सैनिक उपस्थित होते.