
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक शहरात नायलॉन मांजाच्या ( Nylon Manja )विक्रीला बंदी असतांना देखील त्याची विक्री करणाऱ्या कुंभारवाडा येथील एकास भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ( Crime Investigation Team of Bhadrakali Police Station)सापळा रचून अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी पंतग उडविण्यास बंदी असलेला नायलॉन मांजाचा वापर करून मानवी जीवीतास तसेच पक्षी प्राणी यांचे जीवीतास धोका निर्माण करून सार्वजनिक उपद्रव होणार नाही यांस प्रतिबंध म्हणुन नाशिक शहर आयुक्तालयामध्ये नायलॉन मांजा वापरास मनाई आदेश जारी केला होता.
त्यानुसार परिमंडळ १ उपायुक्त किरणकुमार चव्हाण,सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना,यांच्या सूचनेप्रमाणे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशित केले.यावरून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते,अंमलदार रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, धनंजय हासे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रोहीत रमेश साळवे (३० ,रा. गणेश भवन बिल्डींग, कुंभारवाडा, जुने नाशिक) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० नॉयलॉन मांजाचे गट्टु असा २७ हजार ५०० रुपयांचा नायलॉन मांजा हस्तगत करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.