नायलॉन मांजा विक्रेत्यास अटक; ८५ गट्टू केले जप्त

 नायलॉन मांजा विक्रेत्यास अटक; ८५ गट्टू केले जप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात नायलॉन मांजा खरेदी-विक्रीसह मांजा साठा, वापर करण्याचा मनाई आदेश आहे. तरी छुप्या पद्धतीने त्याची विक्री होत आहे. यामुळे पोलिसांची ठीकठिकाणी कारवाई सुरू असून अंबड पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्याला अटक करून 85 गट्टू जप्त केले आहे.

नाशिक शहर गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई प्रविण राठोड यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हिंदुस्थान बेकरी मागे, खाडी, केवलपार्क, अंबड, नाशिक येथे पत्राचे शेडलगत एक इसम नॉयलॉन मांजाची विक्री करत आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, सचिन करंजे, तुषार देसले, समाधान शिंदे यांच्या पथकाने सापळा रचुन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या सोहेल स्वाले खान (वय २२, रा- हिंदुस्थान बेकरी मागे, खाडी, केवलपार्क रोड, अंबड, नाशिक) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ४२,५०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ८५ गटटु जप्त करण्यात आले असुन त्याच्या अंबड पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८, २९०, २९१ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५, १५ व महा.पो. का. क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com