
नाशिक |प्रतिनिधी Nashik
गंगाघाट (Gangaghat )परिसरातील शौचालय परिसरात प्रतिबंधीत नायलॉन मांजा (Nylon Manja )विक्री करण्यास आलेल्या एका युवकास पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station )गुन्हे शोध पथकाने सापळा रचत अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आकाश उर्फ शुभम संतोष धनवटे(१९,रा. गोदावरी नगर,घारपुरे घाट, अशोक स्तंभ नाशिक) याच्याकडे प्रतिबंधित नायलॉन मांजा असून तो विक्रीसाठी घारपुरे घाट येथे आला असल्याची गोपीनाथ माहिती पंचवटी पोलीस ठाण्याच्या गोपीनाथ पथकाला मिळाल्यावर त्यांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून ४८ गट्टू असा ४८ हजार रुपये किंमतीचा नायलॉन मांजा हस्तगत केला. याप्रकरणी शुभम याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.