नायलॉन मांजा जप्त; तीन जण ताब्यात

नायलॉन मांजा जप्त; तीन जण ताब्यात

येवला | प्रतिनिधी Yeola

येवला शहरात Yeola City नायलॉन मांज्याचे Nylon Manja 300 बंडल जप्त करण्यात आले असून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कालच नायलॉन मांजावर बंदी आणावी यासाठी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगलसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली नायलॉन मांजाची होळी करण्यात आली होती.

तरीही येवला शहरात नायलॉन मांजाची अवैधरीत्या सर्रास विक्री होत असल्याने यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत होती , या मागणीची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने धडक कारवाई केली.

शहरातून 300 नायलॉन मांजाचे बंडल जप्त केले Nylon Manja seized असून सुमारे 1 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केले असून मांजा विक्री करणाऱ्या 3 जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com