
येवला | प्रतिनिधी Yeola
पोलिसांनी विक्रेत्यांना नोटिसा देवूनही काही भागात विक्रेते गुपचूप नायलॉन मांजा( Nylon Manja) विक्री करीतच असल्याने असून काल येथे शहर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सुमारे 32 हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
नायलॉन मांजामुळे येवला शहर व परिसरात अनेक नागरिक,मुके जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील शहर व तालुका परिसरात चोरीछुपया पद्धतीने नायलॉन मांजा विक्री होत आहे.काल याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे यांनी शहरातील पिंजार गल्ली भागात पोलिसांनी छापा मारला.
या छापा मध्ये मोनो काईट व मोनो फायटर नाव असलेला बत्तीस हजार पाचशे रुपयांचा नायलॉन मांजा व 70 हजार रुपये किमतीची जुनी ऑटो रिक्षा असा ऐकून एक लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोनू पिंजारी या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.