सातपूरला नायलॉन मांजा जप्त

सातपूरला नायलॉन मांजा जप्त

सातपूर | प्रतिनिधी Satpur

सातपूर Satpur परिसरात गेल्याच महिन्यात दोन वाहन चालक नागरिकांचे गळ्यावर मोठी जखम झाली होती थोडक्यात दुर्घटना टळली होती याबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती प्रशासनाने नायलॉन मांजा Nylon Manja विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

या पार्श्वभूमीवर सातपूर पोलिस Satpur Police विशेष लक्ष देऊन परिसरात शोधमोहीम सुरू केली होती या अंतर्गत एका पतंग मांजा विक्रेत्याकडून सुमारे 51 रिल सहित तीस हजाराचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला .

पोलिस आयुक्त दीपक कुमार पांडे यांच्या यांच्या आदेशान्वये नायलॉन मांजावर बंदी असताना सातपूर परिसरात विक्री होत असल्याने त्यावर विशेष कारवाईचे निर्देश दिले होते.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे,उपनिरीक्षक वाघ मनोहर सूर्यवंशी, गोकूळ कासार,गणेश भामरे, सागर गुंजाळ,संभाजी जाधव, भुजबळ, तांदळा पोलिसांनी धाडसत्र सुरू करत नायलॉन मांजा विक्रेत्याला जेरबंद केले आहे. या कारवाईचे परिसरातून स्वागत केले जात आहे.

Related Stories

No stories found.