नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

अँँक्टिव्हावरून जाणाऱ्या तरूणीला गळ्या भाेवती बांधलेल्या स्टाेलने नायलाॅनच्या मांज्यापासून संरक्षण केले. तरूणीने वेळीच प्रसंगावधान दाखवून गळ्यापुढे काचत चाललेला नायलाॅन मांज्या हाताने अडवून संरक्षण केले.

तसेच तिने चेहऱ्याला व गळ्याभाेवती स्टाेल बांधलेला नसता, तर कदाचित अप्रिय घटना घडली असती. या घटनेत तरूणीच्या गळ्याजवळ मांज्या घासल्याने तिला किरकाेळ दुखापत झाली आहे.

गंगापूर रोडवरून दुपारी चारच्या सुमारास पूजा गणेश संदानशिव (२५, रा. म्हसरूळ) ही युवती ॲक्टिव्हा दुचाकीने हनुमानवाडी-मखमलाबाद रोडने म्हसरूळकडे जात होती.

त्या वेळी सिग्नलजवळ थांबली असता, अचानक हवेतून नायलॉन मांजा आला आणि तिच्या गळ्याला घासला गेला. पूजाने स्टोल बांधल्यामुळे आणि वेळीच तिचे लक्ष गेल्याने तिने एक हात मध्ये आडवा केला.

यामुळे गळ्याभोवती खोलवर गंभीर जखमा झाल्या नाहीत, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही बाब लक्षात येताच परिसरातील महिला व पुरुषांनी धाव घेत पूजाला धीर दिला आणि दिंडोरी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने पूजाला झालेल्या जखमांमधून होणारा रक्तस्त्राव थांबला.

नायलॉन मांजाने काही दिवसांपूर्वी पंचवटीतीली एका दुचाकीस्वार महिलेचा द्वारकेजवळ बळी घेतला.

ही घटना ताजी असताना मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील सिग्नलवर एका दुचाकीस्वार युवतीचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला. गळ्याभोवती असलेला स्टोल आणि युवतीने दाखविलेले प्रसंगावधानामुळे नायलॉन मांजाने ती किरकोळ जखमी झाली.