कांदा, द्राक्ष पिकांसाठी पोषक वातावरण : खुळे

कांदा, द्राक्ष पिकांसाठी पोषक वातावरण : खुळे

पंचवटी । प्रतिनिधी | Panchavati-Nashik

सरासरी पाऊस (Average rainfall) 96 ते 104 टक्के हितकारक असतो. हवामान खात्याने (weather department) दिलेल्या अंदाज हा जवळजवळ 90 टक्के खरा ठरतो. त्यानुसार शेतकर्‍यांनी (farmers) आपल्या पिकांची लागवड (Cultivation of crops) करावी. नाशिक जिल्ह्यात (nashik district) कांदा (onion) व द्राक्ष (Grapes) या नगदी पिकांसाठी पोषक वातावरण (Nutritious environment) आहे.

इतर जिल्ह्यांच्या मानाने या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण हे चांगले असून गारपीटीची प्रमाण कमी असल्यामुळे कांदा व द्राक्ष पिके ही चांगल्या प्रकारे होत असतात, असे प्रतिपदन हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी केले. वसंत व्याख्यानमालेच्या आठवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यशवंतराव महाराज पटांगवर सुरू असलेल्या माधवराव काळे स्मृती व्याख्यान प्रसंगी त्यांनी भारतीय हवामान खात्यातील (Indian Meteorological Department) होणार्‍या तांत्रिक सुविधा (Technical facility) व त्यांच्यातील प्रगतीने हवामान खात्याची झालेली प्रगती, हवामान खात्याच्या वेबसाईटला शेतकर्‍यांनी भेट दिली पाहिजे.

त्यामुळे आपल्या शेती कामासाठी व करावयाची मशागत त्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. भारतीय खात्यातील आधुनिकता कशी आहे, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. यावेळी मंडलेश्वर काळे, मयुरेश काळे, चंद्रशेखर शहा उपस्थित होते. भूषण काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर श्रीकांत येवलेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अशोक महाजन यांनी माधवराव काळे यांच्या स्मृतीस उजाळा दिला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com