दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांना पोषण आहार

दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांना पोषण आहार

पालखेड बं.। वार्ताहर | Palkhed

मार्च 2020 पासून कोरोनाचा (corona) पादुर्भाव वाढत गेल्याने शाळा (school) बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल दोन वर्षे शाळा बंद होत्या ऑनलाईन शिक्षण (online education) सुरू असले तरी विद्यार्थी (students) शाळेत येत नसल्याने

मध्यान्ह भोजन योजनेच्या (Meal plan) माध्यमातून दिले जाणारे जेवण प्रत्यक्ष बंद होते. दोन वर्षांनी शाळेत विद्यार्थी आले आणि पुन्हा एकदा शाळेच्या पटांगणात पोषण आहार (Nutrition diet) खाण्यासाठी विद्यार्थी पंगतीत बसू लागले. त्यामुळे शाळेच्या परिसरात पोषण आहाराचा सुवास दरवळायला लागला आहे.

शाळेत येणारी मुले ही सर्व सदन कुटुंबातील नसतात. त्यात ग्रामीण भागातील (rural area) अनेक कुटुंब दररोज मोलमजुरी करतात. तेव्हा सायंकाळी त्यांची चूल पेटते. अशा मुलांना शाळेत मिळणार्‍या पोषण आहार हा लाख मोलाचा असतो. सकाळी शाळेत येणारी मुले अनेक वेळा उपाशी येतात. त्यांच्यासाठी पोषण आहारात मिळणारे वेगवेगळे पदार्थ हे पोषक ठरतात. शाळा बंदच्या काळात मुलांना तांदूळ (rice) आणि धान्यधी मालचे वाटप करण्यात आले होते.

मात्र आहार घरी शिजवला जात असल्याने संपूर्ण कुटुंब खाण्यास सहभागी होत असे तो केवळ एकाच मुलाला दिला जात नव्हता. त्यामुळे शाळा सुरू होताच शाळेच्या प्रांगणात आहाराच्या पंगती बसायला लागल्याने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. जेवणाच्या सुट्टीत मुलांच्या किलबिलाटाने आणि ताटांच्या खनखनाटाने शाळेचा परिसर प्रसन्न झाला आहे. मुलांच्या पोटभर जेवण मिळायला लागल्याने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत आहे.

याशिवाय करोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर मध्यान्ह व अजून देण्यास अडचणीचे होते, मात्र त्याऐवजी माहे ऑगस्ट 2021 ते मार्च 2022 या कालावधीतील 174 दिवसाचा धान्यादी तूरडाळ व चवळीचे वाटप सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, शालेय समितीचे अध्यक्ष रामा पीठे, उपाध्यक्ष विजय गायकवाड, मुख्याध्यापक अण्णा वानखेडे, संदिप गायकवाड आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.