परिचारिकांचा आंदोलनाचा इशारा

सेवकांची संख्या अपुरी असल्याने संताप
परिचारिकांचा आंदोलनाचा इशारा

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू असल्याने उपायोजनेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 खाटा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र यापुर्वीच कर्मचार्‍यांवर अधिकच ताण असताना कर्मचारी संख्या वाढलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या परिचारीकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी बैठक घेत सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने तुर्त हे आंदोलन टळले आहे.

जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मात्र सफाई कर्मचारी, परिचरिकांची संख्या न वाढवल्याने आहे त्या परिचरिकांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यातच पीपीईकिट जाड असल्याने ते घालून सेवा बजावणे असह्य झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने परिचारिका संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे डॉ. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली.

त्यात संघटनेच्या अध्यक्षा पूजा पवार, सचिव कल्पना पवार, कार्याध्यक्ष सीमा टाकळकर, शुभांगी वाघ, कल्पना धनवटे, सोनल मोरे, अधिसेविका शमा माहुलीकर आदी उपस्थित होते. बैठकीत पुढील 7 दिवसात 36 नर्सिंग स्टाफची पदे भरण्यासोबतच इतर विभागातील कर्मचार्‍यांना प्रतिनियुक्तीवर आणले जाईल. वर्ग चार कर्मचार्‍यांची लवकर भरती करण्यात येईल, प्रत्येक वॉर्ड मध्ये प्रत्येक वार्डला किमान 2 कर्मचारी उपलब्ध होतील असे आश्वासन परिचरिकांना देण्यात आले. चांगल्या दर्जाचे पीपीकिट आणि मास्क लवकर उपलब्ध करून देणार येतील त्यासाठी ीराीेपळींश कंपनी बरोबर बोलणे झाल्याचे सांगण्यात आले.

बाह्य रुग्ण कक्ष इमारतीत परिचारिका आणि त्यांचे नातेवाईक यांच्या टेस्टिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल तसेच पॉझिटिव्ह येणार्‍या स्टाफला प्रामुख्याने तातडीने उपचार आणि मेडिकेशन सुरू करण्यात येईल आशा मुख्य मागण्यांबाबत डॉ. थोरात यांनी सकारात्मकता दर्शवली. येत्या सात दिवसात सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन मिळाल्याने परिचरिकांनी आंदोलन स्थगित केले. तुर्त जरी हे आंदोलन टळले असले तरी कर्मचार्‍यांच्या भरतीबाबत शासनाची चालढकल चालली असल्याने हे आंदोलन किती दिवस रोखले जाईल असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com