वृक्ष लागवडीसाठी देवळालीकर एकवटले

वृक्ष लागवडीसाठी देवळालीकर एकवटले

देवळाली कॅम्प | वार्ताहर | deolali Camp

कोरोनाकाळात (Corona) ऑक्सिजनचे (Oxygen) महत्व लक्षात आल्याने नागरिकांचा कल वृक्ष लागवडीकडे (Tree Plantation) वाढत आहे. वृक्षप्रेमी आपले घर अथवा बागेत लावण्यासाठी फुलं (Flowers), फळंं (Fruits), शोभेच्या झाडांची मागणी करत असल्याचे चित्र आहे...

पावसाळ्याची चाहूल लागली की, अनेक नागरिक आपल्या घराच्या अंगणात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करतात. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे.

वृक्षारोपणाबाबत ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर रोपवाटिकेमधून विविध प्रकारच्या आऊटडोअर व इनडोअर वृक्षांची खरेदी केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग विविध रोपवाटीकांमधून रोपे खरेदी करताना दिसून येत आहे.

२५ रुपये किंमत असणाऱ्या गुलमोहरपासून सर्वाधिक महाग २५० रुपयांच्या वडाच्या रोपांची मागणी होत असल्याची माहिती नर्सरी चालक तुषार हिरे (Tushar hire) यांनी दिली. पावसाच्या पाण्यात वृक्ष वाढीस लागणारे घटक अधिक असल्यामुळे या काळात नागरिकांचा वृक्ष लागवडीकडे अधिक कल असतो.

शेतकरीदेखील आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन नगदी पीक म्हणून हल्ली फुलशेती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे फुलांच्या रोपांची खरेदीदेखील केली जात असल्याची माहिती नर्सरी चालक शरद आडके (Sharad adke) यांनी दिली आहे.

सध्या परिसरातील नागरिक विविध प्रकारचे रोपे खरेदी करण्यासाठी रोपवाटिकेत गर्दी करत आहेत. यामुळे नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्व समजत असल्याचे दिसून येते.

चेतन गोडसे, रोपवाटिका चालक.

घरातील सर्व सदस्यांना वृक्षारोपणाची आवड असल्यामुळे आम्ही विविध प्रकारच्या रोपांची खरेदी केलेली आहे.

भानुदास संधानशिव, ग्राहक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com