जिल्ह्यात करोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढली

बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा पॉझिटिव्हपेक्षा हजाराने अधिक; आज 33 बळी
जिल्ह्यात करोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढली
करोना

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात एकीकडे करोनाचा उद्रेक सुरूच असताना दुसरीकडे मात्र कोरोनावर मात करणार्‍यांचा आकडा वाढत चालल्याने दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 3 हजार 691 जणांचे अवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा पॉझिटिव्हपेक्षा हजाराने अधिक आहे. एकुण 4 हजार 838 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान मृत्युचे प्रमाणही घटले असून आज 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. तसेच मृत्युचे प्रमाणही ग्रामिण भागात अधिक असल्याचे चित्र आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 838 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 90 हजार 563 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 3 हजार 691 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 2 हजार 179 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 96 हजार 746 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 372 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 1 लाख 18 हजार 231 झाला आहे.

मालेगावात 40 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 11 हजार 507 झाला आहेे. जिल्हा बाह्य 100 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 4 हजार 553 झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 31 हजार 37 इतका झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये घटन होत असून आज जिल्ह्यात 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 24 रूग्ण आहेत, नाशिक शहरातील 8, मालेगाव येथील 1 रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 568 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 5 हजार 10 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 4 हजार 705 नाशिक शहरातील आहेत. तर आज दिवसभरात 41 हजार 916 रूग्णांवर उपचार सुरू होते.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,31,037

* नाशिक : 1,96,746

* मालेगाव : 11,507

* उर्वरित जिल्हा : 1,18,231

* जिल्हा बाह्य ः 4,553

* एकूण मृत्यू: 3,568

* करोना मुक्त : 2,90,563

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com