जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ५३९१ वर

तर शहर २ हजार ९४२ वर
जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ५३९१ वर
कोरोना

नाशिक : शहरात करोनाचा उद्रेक सुरूच असून जिल्ह्यातील विविध भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज चोवीस तासात जिल्ह्यात २०४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एकट्या नाशिक शहरातील १६२ आहेत यामुळे शहरातील रूग्णांची संख्येने २ हजार ९४२ झाली आहे. तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ५ हजार ३९१ झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून ६६२ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील ७ रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या २७७ झाली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार जिल्ह्याभरात आज दिवसभरात एकुण २०४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील १६२ रूग्ण आहेत. यात शहरातील जुने नाशिकसह काठेगल्ली, पंचवटी येथील नाशिकरोड परिसरातील अधिक अहवाल आहेत. तसेच शहरातील हिरावाडी , देवळाली गाव, पवननगर, जुने नाशिक, द्वारका पेठरोड, मखमलाबादरोड, वडाळा अशा रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा २९४२ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील ३८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १२२९ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक नामपुर ५, ओझर ४, पिंपळगाव केतकी ३, येवला, सिन्नर , ओझर येथील रूग्ण आहेत. तर प्रथमच गिरणारे, गोवर्धन, देवरगाव अशा विविध भागात रूग्ण आळले आहे. शांत झालेल्या मालेगावमध्ये ४ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १०८६ झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १३४ वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज ७ जणांचा मत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा २७७ झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील आज १६५ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा २९८४ वर पोहचला आहे.

नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने तब्बल ६६२ संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ४९४ आहेत. जिल्हा रूग्णालय १३, ग्रामिण १२०, मालेगाव १०, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ७, गृहविलगीकरण १८ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून २४ हजार २४८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील १८ हजार २९६ निगेटिव्ह आले आहेत. ५ हजार ३२३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २०६२ उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित : ५३९१

* नाशिक : २९४२

* मालेगाव : १०८६

* उर्वरित जिल्हा : १२२९

* जिल्हा बाह्य : १३४

* एकूण मृत्यू : २७७

* करोनामुक्त : २९८४

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com