कनिष्ठ महाविद्यालयांना 'अच्छे दिन' येणार

कनिष्ठ महाविद्यालयांना 'अच्छे दिन' येणार
USER

नाशिक | Nashik

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकरावीतील रिक्त जागांची संख्या बऱ्यापैकी घटणार असून कनिष्ठ महाविद्यालयांना 'अच्छे दिन' येणार आहेत.

दहावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. त्यासाठी १६ लाखांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, करोनाचा संसर्ग वाढला आहे. राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता तज्ज्ञ समिती विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे याबाबत विचार करीत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दहावीच्या निकाल ९३ ते ९७ टक्क्यांपर्यंत लागत आला आहे. सीबीएसईनेही दहावीची परीक्षा न घेण्याचे ठरविले आहे. असे असतानाही अकरावी प्रवेशात किमान ४० टक्के जागा रिक्त असल्याचे दिसते. गेल्यावर्षी ५ लाख ४३ हजार ७८५ जागांपैकी ३ लाख ६६ हजार ६३७ जागांवर प्रवेश देण्यात आले.

मात्र, विविध महाविद्यालयातील १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त राहिल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक, आयटीआयला पसंती दिली. मात्र, यावेळी परीक्षाच रद्द झाली असल्याने विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का निश्चित वाढणार आहे.

त्यामुळे या रिक्त जागा भरण्याची चिन्हे आहेत. बारावीमध्ये ही असाच प्रकार दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदवी प्रवेशातील रिक्त जागांची समस्या दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com