जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी दोन हजार पार

करोना रूग्णांचा आकडा 1 लाख 45 हजार वर
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी दोन हजार पार

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला पुन्हा एकदा सलग चौथ्या दिवशी एकाच दिवसात दोन हजार पेक्षा अधिक नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्याचा करोना रूग्णांचा आकडा 1 लाख 45 हजार 778 इतका झाला आहे.

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार ते दिड हतार नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल होत आहेत. शनिवारी हा आकडा अचानक 2 हजार 383 वर पोहचला आहे. करोना रूग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाच्या चिंताही वाढल्या आहेत.

मार्च 2020 पासून जिल्ह्यातील आतापर्यंत करोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 45 हजारच्यावर पोहचला आहे. तर सध्या जिल्हाभरात 15 हजार 242 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आहे. अवघ्या 10 दिवसात 27 हजार करोना रूग्ण वाढले आहेत.

मागील चोवीस तासात 848 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 28 हजार 326 वर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण करोना मुक्तीचे प्रमाण घसरून 97 टक्केंवरून घसरून 88 टक्केंवर खाली आले आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 2 हजार 383 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 399 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 94 हजार 749 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 785 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 42 हजार 269 झाला आहे. मालेगावात 166 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 6 हजार 991 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 1 हजार 769 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून यामध्ये आज वाढ झाली जिल्ह्यात 8 रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात नाशिक शहरातील 3 तर ग्रामिण भागातील 5 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 210 इतका झाला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 2 हजार 450 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 2 हजार 309 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 91 तर मालेगाव येथील 37 आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित : 1,45,778

* नाशिक : 94,749

* मालेगाव : 6,991

* उर्वरित जिल्हा : 42,269

* जिल्हा बाह्य ः 1,769

* एकूण मृत्यू: 2,210

* कोरोनमुक्त : 1,28,326

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com