दिलासादायक ! त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रुग्ण संख्या घटली !

दिलासादायक ! त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रुग्ण संख्या घटली !

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आता करोना रुग्ण संख्या 100 शंभर वर आली. मोठ्या प्रमावावर रुग्ण कमी झाल्याने तालुक्याला जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे सरकारी रूग्णालये, आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न कामाला आले आहे.

कोरोना कोव्हीड -19 पासुन बचाव करण्यासाठी गेल्या वर्षभरा पासुन त्र्यंबकेश्वर तालुका लढा देत आहे.

आणि या लढ्याचे सुत्रे तालुक्या तील आरोग्य सेवेच्या तीन महिला डाॅ.मंदाकिनी बर्वे डाॅ. उज्ज्वला तेजाळे व डाॅ. रेखा सोनवणे या दोन महिला वैद्यकीय अधिक्षक व एक महिला वैद्यकीय अधिकारी यांचेकडे होती.

तर सह त्र्यंबक भागात सर्वांना दीर्घकाळ परिचित असलेले डॉ भागवत लोंढे हे कार्यरत होते. तसेच सर्व सहकारी डाॅक्टर्स नर्स करोनाशी लढा देताना जागरूक होते. रुग्ण बरा झाला याचा आनंद रुग्ण बरोबर डॉक्टरांना समाधान देत होता.

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक म्हणुन डाॅ.मंदाकिनी बर्वे हरसुल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक तथा हरसुलच्या नोडल अधिकारी डाॅ.उज्ज्वला तेजाळे व अंजनेरी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तथा अंजनेरी ट्रेकींग कोव्हीड केअर सेंटरच्या व त्र्यंबकेश्वर शिवप्रसाद कोविड केअर सेंटरच्या नोडल अधिकारी रेखा सोनवणे काम पाहतात. तर हरसुल येथील रुग्णालय प्रमुख कारभार डॉ उज्ज्वला तेजाळे या पहात होत्या सांभाळत आहे या कामासाठी मोठा फौजफाटा मदतीसाठी शासनाने तैनात केला आहे.

वैद्यकीय स्टाफमध्ये डाॅ.भागवत लोंढे डाॅ.प्रशांत पाटील डाॅ. धनंजय गायके डाॅ.मनिता कोठावदे डाॅ.निलिमा बच्छाव डाॅ.पंकज निकम डाॅ. सनिलकुमार पाटील डाॅ.प्रतिक दुसाने आदी वैद्यकीय अधिका-यांसह सर्व स्टाफ प्रोसेस तथा सिस्टर्स स्वच्छता कर्मचारी आदी सर्व कोरोना योध्यांची भुमिका बजावत आहेत.

अंजनेरी डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये कोव्हीड केअर सेंटर पेक्षा कोणाला ऑक्सिजन गरज पडल्यास अशा रुग्णांना ऑक्सिजन लावणे. रेमडिसीवर इंजेक्शन देणे. ऑक्सिजन व रेमडिसीवर तुटवडा भासत असताना उपलब्ध साठा सामग्री बाबत दक्ष राहून रुग्णांना बरे करणे हेच ध्येय बाळगून वरील डॉ. कार्यरत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com