करोना
करोना
नाशिक

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 21 हजारांवर

24 तासात जिल्ह्यात 565 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्हात करोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 565 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा 21हजार 76 इतका झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 565 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 522 रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, नाशिकरोड, पंचवटी, सातपुर गाव, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 14 हजार 327 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 40 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 4 हजार 942 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला, इगतपुरी, सिन्नर, सुरगाणा, इगतपुरी, नांदगाव, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगावत आज 3 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 624 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 183 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 580 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 15 हजार 861 वर पोहचला आहे.

आज करोनामुळे 24 तासात 12 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 10 नाशिक शहरातील असून ग्रामिण भागातील 2 यांचा सामावेश आहे.

नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 873 संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक 408 तर ग्रामिण जिल्ह्यातील 249 आहेत. जिल्हा रूग्णालय 7, मालेगाव 40, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 13 व होम कोरोंटाईन 156 रूग्णांचा समावेश आहे.

(वरील आकडेवारी दि.११ ऑगस्ट २०२० रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com