आदिवासी तालुक्यांत करोना आटोक्यात

निफाड, नाशिक, सिन्नर हॉटस्पॉट
आदिवासी तालुक्यांत करोना आटोक्यात
करोना

नाशिक। प्रतिनिधी

जिल्हाभरात उद्रेकानंतर आता करोनाची लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे. हा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येत असला तरी नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामिण भागातून रूग्ण अधिक पॉटिव्ह येत आहेत. तसेच मृत्यु दरही जास्त आहे. काही तालुके करोनाचा हॉट स्पॉट म्हणून पुढे येत असताना आदिवासी तालुके मात्र करोना प्रसार कमी ठेवण्यात यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, कळवण, इगतपूरी हे तालुके करोना प्रसारामध्ये सर्वात शेवटी आहेत. तर याऊलट नाशिक तालुका करोना पॉझिटिव्हमध्ये अग्रक्रमावर असून त्याखालोखाल सिन्नर, निफाड आणि मालेगाव ग्रामीणचा समावेश आहे. या तालुक्यांत एकूण रुग्णसंख्या अधिक आहेच परंतु त्याचबरोबर अजूनही एकेका दिवसात अगदी 90 ते 150 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी पर्यंत करोना रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग अधिक होता. दररोज किमान साडे तीन ते साडे चार हजार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. परंतू ब्रेक द चेन अंतर्गत नाशिक शहरासह जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. याशिवाय लॉकडाऊनचीही कठोरपणे अंमलबजावणी होत असल्याने करोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या हळूहळू कमी होते आहे.

दररोज बाधित आढळणार्‍या रुग्णांची संख्या आता 1700 ते 1800 पर्यंत आली आहे. म्हणजेच ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी काही तालुक्यांत अजूनही तुलनेने अधिक संख्येने बाधित आढळून येत आहेत. यामध्ये नाशिक तालुक्याचा क्रमांक अग्रक्रमावर आहे. तालुक्यात शहरालगतच्या गावांचा समावेश असून तेथेही मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव होतो आहे.

मंगळवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 हजार 73 रुग्ण आढळले. जिल्ह्यात सर्वाधिक 22 हजार 511 रुग्ण निफाड तालुक्यात बाधित झाले आहेत. तिसर्‍या क्रमांकाचे रुग्ण सिन्नर तालुक्यात आढळले असून ही रुग्ण संख्या 17 हजार 571 आहे. सोमवारी सिन्नरमध्ये 149 तर निफाडला 94 बाधित आढळले आहेत.

तर आदिवासी तालुक्यांमध्ये सर्वात कमी रूग्ण पेठ तालुक्यात असून ते केवळ 883 आहेत. सुरगाणा 1827, त्र्यंबके 4406, कळवण 4793 तर आदिवासी तालुक्यात सर्वात अधिक 6451 रूग्ण इगतपूरी तालुक्यात आहेत. असे असले तरी हे तालुके इतर तालुक्यांच्या तुलनेत निम्मापेक्षा अधिक करोना मुक्त आहेत.

तालुकानिहाय रुग्ण

तालुका- एकूण रुग्ण

पेठ- 883

सुरगाणा- 1827

त्रम्बकेश्वर- 4406

कळवण- 4793

इगतपुरी- 6451

येवला- 5983

निफाड- 22511

नाशिक- 19284

सिन्नर- 17571

नांदगाव- 11210

दिंडोरी- 9759

बागलाण- 8960

चांदवड- 8546

मालेगाव ग्रा- 7824

देवळा- 7301

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com