नाशिक । Nashik

नाशिक शहरत तसेच जिल्हात करोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. जिल्ह्यासह भागात दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 274 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंतचा करोना पॉझिटिव्हचा आकडा 35 हजार 320 इतका झाला आहे. तर आज दिवसभरात 17 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 1 हजार 272 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 958 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 24 हजार 8 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 277 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 8 हजार 634 झाला आहे. मालेगावत पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. दिवसभरात 36 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 2 हजार 467 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 211 झाला आहे. तर 24 तासात जिल्ह्यातील 641 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 27 हजार 978 वर पोहचला आहे.

करोनामुळे दिवसभरात 17 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 13 नाशिक शहरातील आहेत. तर ग्रामिण भागातील 3 तर मालेगावच्या एका रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 856 वर पोहचला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडा वाढत आहे. 24 तासात 1 हजार 230 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 999, ग्रामिण व गृह विलगीकरण 171, मालेगाव 29, जिल्हा रूग्णालय 9, डॉ. पवार रूग्णालय 22 रूग्णांचा समाावेश आहे.