‘प्रज्ञाशोध’ परीक्षा १३ डिसेंबरला

पदवी परीक्षा
पदवी परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएस) येत्या 13 डिसेंबर रोजी होणार आहे.

इयत्ता दहावीत शिकत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येतील. विलंब शुल्कासह 26 ते 30 ऑक्टोबर दरम्यान, तर अतिविलंब शुल्कासह 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थी अर्ज करता येतील.

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढील वर्षी 13 जून रोजी होईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील 2000 प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते.

मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, इंजिनिअरिंग, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवी पर्यंतच दिली जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com