आमदार हिरामण खोसकर
आमदार हिरामण खोसकर
नाशिक

त्र्यंबकेश्वर : आता ग्रामपंचायतमध्ये रेशनकार्ड मिळणार

आमदार खोसकर यांचा पुढाकार

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना आता ग्रामपंचायत च्या माध्यमातून रेशनकार्ड मिळण्याची सुविधा तालुक्यात होत असून याबाबत ची बैठक ठाणापाडा येथे घेण्यात आली. आमदार हिरामण खोसकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान हे रेशनकार्ड आपणास ग्रामपंचायत मध्ये मिळणार असू यासाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. ठाणा पाडा येथे या उपक्रमाची सुरवात होणार असून त्यानंतर तालुक्यात मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची होणारी हेळसांड या माध्यमातून थांबविण्यात येईल असे आमदार खोसकर यांनी सांगितले.

लॉक डाउनच्या काळात व अद्यापही रेशनकार्ड असलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे. तर रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनाही धान्य पुरवठा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांना हक्काचे रेशनकार्ड मिळावे यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्याने ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

तसेच वनपट्टे विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांना भेटा व आथिँक मदत मिळुन देण्यात येणार आहे. यासाठी आमदार खोसकर यांच्या माध्यमातून ग्रामसेवक व तहसिलदार, तलाठी यांच्याकडे मोफत अर्ज मिळणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com