आता बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच मिळणार 'ही' सुविधा

आता बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच मिळणार 'ही' सुविधा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुद्रांक जिल्हाधिकारी (Collector of Stamps), नरेडको, बँक प्रतिनिधींची ई- रजिस्ट्रेशन (e-registration) सुविधेबाबत एकत्रित बैठकीत मुद्रांक कार्यालयात (Stamp Office) दस्त नोंदणी (Registration of Deeds) साठी होणारी गर्दी लक्षात घेता

ऑनलाइन दस्त नोंदणी (Online Deed Registration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे (Stamp Collector Kailas Davange) यांनी नरेडको संघटनेला दिले.

मुद्रांक जिल्हाधिकारी, नरेडको, बँक प्रतिनिधींची ई- रजिस्ट्रेशन सुविधेबाबत एकत्रित बैठक मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. राज्य शासनाच्या मुद्रांक व स्टॅम्प विभागाने (Department of Stamps) केलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त बांधकाम व्यावसायिक (construction professional) यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले. बांधकाम व्यावसायिकांच्या विविध करारनाम्यासाठी मुद्रांक कार्यालयात जावे लागते, बहुतेक ठिकाणी गर्दी व इतर तांत्रिक अडचणी भेडसावत असतात.

नरेडको नाशिक व बँक प्रतिनिधी यांनी सर्व माहितीचे तपशील समजावून घेत येत्या दोन-तीन दिवसात ऑनलाइन प्रोजेक्ट नोंदणी व दस्त नोंदणी करण्याचे उपस्थित होते. प्राथमिक स्वरूपात यामध्ये दहा बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. मुद्रांक जिल्हाधिकारीकार्यालयात आयोजित बैठकीत नरेडको नाशिक अध्यक्ष अभय तातेड, मानद सचिव सुनील गवादे, जयेश ठक्कर शंतनू देशपांडे, भाविक ठक्कर आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com