आता 'या' साठी होणार मनपाकडून शुल्क आकारणी

आता 'या' साठी होणार मनपाकडून शुल्क आकारणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात आता पाळीव छोटे आणि मोठे जनावरे दगावल्यास मालकास पालिकेकडे शुल्क आकारणी भरावी लागणार आहे. श्वानासाठी तीनशे रुपये तर मोठे जनावरे असलेल्या गायी, म्हैससाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. असे शुल्क आकारले जात नव्हते मात्र आता पालिका याप्रकरणी मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी दर आकारणार आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्थायी सभेत निर्णय घेतला आहे. सभेत नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावणे आणि त्याकामी शुल्क आकारणीला मंजुरी देण्यात आली. दरम्यान मागील काही वर्षांपासून पडझड झालेल्या पश्चिम विभाग अंतर्गत येणार्‍या मेनरोडवरील विभागीय कार्यालयाचे नूतनीकरण केले जाणार आहे.

ही वास्तू धोकेदायक बनल्याने काही कालावधीपासून पश्चिम विभागाचे काम पंडित कॉलनी आणि पूर्व विभागामधील कार्यालयात सुरु आहे. त्यामुळे मेनरोडवरील इमारतीचे नूतनीकरण व्हावे, याकरिता मागणी केली जात होती. सभेत या कार्यालयाच्या दगडी इमारतीची दुरुस्ती करुन नूतनीकरणसाठी 2 कोटी 28 लाख 91 हजार 929 इतक्या रकमेपर्यंत काम करून घेण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com