
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
टपालसेवकही (Postman) देशव्यापी संप (Nationwide strike) करणार आहेत.
इ पी एस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण भारतभर 200 ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. कमीत कमी 7500 पेन्शन (Pension) दरमहा त्यावर आधारित
महागाई भत्ता (dearness allowance) व पेन्शनर पती-पत्नीला मोफत मेडिकल आधी प्रमुख मागण्यांसाठी गोल्फ क्लब मैदान येथे दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता सर्व कामगार (workers) बांधवांनी उपस्थित राहावे. असे आवाहान गिरीश वलवे, सुरेश जाधव अध्यक्ष नाशिक जिल्हा अरुण शेजवळ, जिल्हा सचिव कैलास आहेर,
जिल्हा उपाध्यक्ष के के देशपांडे आदींनी केले आहे तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी व सर्व युनियन पदाधिकार्यांनी सदर आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा द्याव. असे संघटनेच्या वतीने कळवीण्यात आले आहे. टपालसेवकही 16 व 17 मार्चला देशव्यापी संप करणार आहेत. असे अध्यक्ष राजाराम जाधव, कृष्णा गायकवाड, शकील सय्यद यांनी कळवीले आहे.