
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बैलगाड्याऐवजी यांत्रिकी वाहनांचा (mechanical vehicles) उपयोग केला जावा यासाठी 'अॅनिमल राहत'ने पाठपुरावा केला होता.
आता केंद्र सरकारने (Central Govt) या कामासाठी 128 कोटी 78 लाख रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे आता बैलांचे (oxens) कष्ट कमी होणार आहेत. केंद्र सरकारच्या (Central Govt) योजनेमुळे महाराष्ट्रात बैलांच्या ऐवजी आता हार्वेस्टर्सचा (Harvesters) उपयोग केला जाणार आहे. उस कारखान्यांमध्ये (sugur factory) बैलगाड्यांंचा वापर करण्यामुळे बैलांना खूप त्रास सोसावा लागतो. बैलगाड्याऐवजी यांत्रिकी वाहनांचा उपयोग केला जावा यासाठी अॅनिमल राहतने पाठपुरावा केला होता.
एका साखर कारखान्यात 800 बैलांचा वापर केला जात असल्यामुळे, सरकारच्या या योजनेमुळे असंख्य बैलांची होणार्या त्रासातून मुक्तता होईल अशी अपेक्षा आहे. दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील कारखान्यांमध्ये सुमारे 50,000 बैलांऐवजी 900 नवीन हार्वेस्टर्सचा उपयोग केला जावा हे महाराष्ट्र कृषि मंत्रालयाचे (Maharashtra Ministry of Agriculture) उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारद्वारा साखर कारखान्यांना हार्वेस्टर्स खरेदी करण्यासाठी सबसिडी (subsidy) किंवा संपूर्ण अनुदान देण्यात येईल.
राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याला, तो सहकारी असो किंवा खाजगी, त्यांना ह्या निधीचा लाभ घेता येईल. इतर राज्ये देखील राष्ट्रीय कृषि विकास (National Agricultural Development) कार्यक्रमाच्या अंतर्गत (आरकेव्हीवाय) या हेतूसाठी केंद्र सरकारचा निधी (fund) उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील उसाचा हंगाम ऑक्टोबर ते एप्रिल ह्या कालावधीत असतो.
यासाठी ज्या बैलांचा उपयोग केला जातो त्यांना 3 टनापेक्षा जास्त भार असलेल्या गाड्या 18 किलोमीटर पेक्षा अधिक अंतर ओढून नेताना खूप कष्ट सोसावे लागतात, व अशा प्रकारे प्रचंड भार ओढण्यामुळे त्यांना ठणकणारे फोड येतात, त्यांचे गुडघे सुजतात, गाल आणि स्नायूं दुखणे असे आजार होतात. अनेक वेळा त्यांना चांबकाने झोडपले जाते आणि अतिशय आक्रमकपणे हाताळले जाते, योक स्पाईकचा उपयोग केला जातो त्यामुळे त्यांच्या मानेला ईजा होतात आणि त्यांना पुरेसे पाणी, अन्न, विश्रांती व निवारा दिला जात नाही.
जे बैलांचे मालक मिनी ट्रॅक्टर्सचा उपयोग करण्यास सुरूवात करतील. त्यांना अॅनिमल राहत द्वारा त्यांच्या बैलांना शांत निवृत्त जीवन प्रदान करण्यास मार्गदर्शन केले जाईल. यांत्रिकीकरणाचा वापर करणार्या मजुरांचा बैल आजारी पडण्यामुळे किंवा त्यांना ईजा होण्यामुळे उपजिविका गमावण्याचा होणारा धोका टाळता येतो.
जितका हार्वेस्टर्सचा जास्त उपयोग केला जाईल तितकी शेतातून उसाची कापणी लवकर केली जाईल व शेत लवकर मोकळे होईल व त्यामुळे शेतकर्यांना पुढील पिकाच्या नियोजनासाठी अधिक वेळ मिळेल. “बैलांऐवजी यांत्रिक वाहनांचा उपयोग करण्यास सुरूवात केल्यास त्याचा, अगदी बैलांपासून ते साखर कारखान्यांच्या मालकांपर्यंत सर्वांनाच फायदा होतो,” असे अॅनिमल राहतचे अधीकारी पशुवैद्यकीय डॉ. नरेश उप्रेती, शशिकांत भारद्वाज यांनी सांगीतले.