नाशिक । Nashik

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था अर्थात (एसपीआय)च्या प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आता नाशिकलाही होणार आहे. यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विदयार्थ्यांचा वेळ वाचणार आहे.

दरम्यान २०२१ पासून प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ६० जागांवर प्रवेशासाठी राज्यभरातून आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी रांगेत असतात. मी मध्ये झालेल्या परीक्षेनंतर ४३ व्या तुकडीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एसपीआयन या परीक्षे संदर्भात अनेक बदल केले असून हि परीक्षा आता चार ऐवजी आठ केंद्रावर घेतली जाणार आहे. त्यामध्ये नाशिकचाही समावेश करण्यात आला आहे.

मागील वर्षापर्यंत राज्यात पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद या चार केंद्रावर परीक्षा घेतली जात होती. यंदापासून नाशिक, लातूर, अमरावती आणि मुंबई या चार नव्या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.

तर दुसरी बाब म्हणजे वाढलेली परीक्षार्थींची संख्या अन् विविध शहरांमधून घ्यावी लागणारी लेखी परीक्षा, मुलाखतीची प्रक्रिया. त्यामुळे श्रम, वेळ जातो आहे. त्यासाठी आगामी दोन वर्षांत परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार 'एसपीआय' करते आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील एन्सीची मदत घेतली जावू शकते. त्याची चाचपणी केली जाते आहे. ऑनलाइन परीक्षा औरंगाबादमधून घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थांचा त्रास कमी होणार आहे.