आता चिठ्ठीशिवाय होणार रूग्णांवर उपचार : अ‍ॅड. ठाकरे

आता चिठ्ठीशिवाय होणार रूग्णांवर उपचार : अ‍ॅड. ठाकरे

मालेगाव । तिनिधी | Malegaon

मविप्र संस्था (MVP Institute) संचलित वैद्यकिय महाविद्यालयात (Medical College) सर्व सोयीसुविधा सभासदांना उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून उपाययोजना केल्या जात आहे.

चिठ्ठी संस्कृती बंद करत कोणत्याही चिठ्ठीशिवाय रूग्णांवर उपचार (Treatment of patients) करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मागील काळात सत्ताबाह्य केंद्राच्या माध्यमातून संस्थेचा कारभार सुरू होता. आमच्या कार्यकाळात असे काही होवू दिले जाणार नसल्याचे प्रतिपादन सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे (General Secretary Adv. Nitin Thackeray) यांनी येथे बोलतांना केले.

येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मविप्र संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीचा सत्कार तसेच सभासदांचा आभार मानण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सरचिटणीस ठाकरे बोलत होते. ज्येष्ठ नेते दशरथ निकम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मविप्र माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Former president of MVP Dr. Frost moss) यांच्यासह विद्यमान उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, तालुका संचालक अ‍ॅड. आर.के. बच्छाव, संदीप गुळवे, प्रवीण जाधव, लक्ष्मण लांडगे, डॉ. प्रसाद सोनवणे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, पगार, कृष्णाजी भगत, नंदकुमार बनकर, रमेश पिंगळे, महिला सदस्य शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, सेवक संचालक सी.डी. शिंदे, नानासाहेब दातवे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

सत्ताबाह्य केंद्राच्या माध्यमातून चालवीला जात असलेल्या कारभारानेच संस्था अडचणीत आली. सभासदांचा मान राखला गेला नाही हे प्रकार आमच्या काळात होणार नाही, अशी ग्वाही देत सरचिटणीस ठाकरे पुढे म्हणाले, मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) सभासदांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे चिठ्ठी प्रकार बंद करत चिट्ठी शिवाय उपचार करण्याबाबत डॉक्टरांना (Doctors) स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सभासदांनी परिवर्तन पॅनलवर विश्वास ठेवण्याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. अन्यथा ही संस्था एका कुटुंबाची प्रायव्हेट लिमिटेड संस्था झाली आम्ही सूडबुद्धीने वागणार नाही. मात्र कर्मचार्‍यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये. अन्यथा कोणी कोणाच्या जवळचा दूरचा असला तरी कारवाई अटळ राहणार असल्याचा इशारा अ‍ॅड. ठाकरे यांनी शेवटी बोलतांना दिला.

यावेळी सभासदांतर्फे बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी मार्गदर्शन करत सभासदांच्या विविध अडीअडचणी मांडत नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन सभासदांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे आवाहन केले. यावेळी प्रास्ताविक करतांना तालुका संचालक अ‍ॅड. आर.के. बच्छाव (Taluka Director Adv. R.K. rescue) यांनी सोयगाव (Soygaon) महाविद्यालयाचा वाढता विस्तार लक्षात घेत दुसरा मजला निर्माण करावा तसेच नर्सिग व पशु वैद्यकिय महाविद्यालयासारखे रोजगाराभिमुख शिक्षण मालेगावी चालू करावे, अशी मागणी केली.

प्रारंभी मविप्र पदाधिकारी व तालुका संचालकांची सोयगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. मनोज जगताप यांनी तर मुख्याध्यापक जे.एन. खैरनार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रम पवार, आर. के. बच्छाव, जे. पी. बच्छाव, परिक्षित बच्छाव आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com