आता विवाह परवानगीसाठी 'एक खिडकी' योजना

नियमात लग्न न करणारांवर गुन्हे
आता विवाह परवानगीसाठी 'एक खिडकी' योजना

नाशिक । Nashik

शहर तसेच परिरात सर्वत्र लग्न मोठ्या धामधूमीत सुरू आहेत. पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून लग्नांसारख्या सोहळ्यातून तो अधिक पसरू नये यासाठी शासनाने शंभर वर्‍हाडींच्या उपस्थितीत सर्व नियम पाळून लग्न उरकण्याचे आदेश दिले आहेत.

अशा विवाहांना परवानगी देण्यासाठी शहर पोलिस एक खिडकी योजना सुरू करणार आहेत. मात्र परवानगी तसेच नियमांकडे दुर्लक्ष करणारांवर कडक कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

करोनाचा प्रभाव कमी होताच शहरात शुभ मुहुर्त नसताना काढीव मुहर्तावर विवाह समारंभाचा बार उडाला आहे. शंभर जणांच्या उपस्थितीकडे कानाडोळा करीत हजारो वर्‍हाडीच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडू लागले आहेत. अर्थात यामुळे करोना वाढीस हातभार लागला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा विवाह सोहळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे सुतोवाच केले.

विवाह समारंभात नियमांचे पालन होत नाही, हा कळीचा मुद्दा असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विवाह आयोजकांना नक्की नियम काय आहेत याची तर, पोलिसांना विवाह स्थळाची पूर्व कल्पना आलेली असेल. आयुक्तालयातच परवाना विभागात विवाहांसाठी एक खिडकी योजना सुरू होईल.

त्यात विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतील. ही कागदपत्रे तेथेच लागलीच तपासून पुढील निर्णय देण्यात येतील. विवाह सोहळ्यासाठी शंभरजणांची उपस्थिती, सोशल डिस्टेन्सींग, सॅनिटायझर तसेच मास्कचा वापर अनिवार्य आहे. याची माहिती पोलिसांकडून विवाह आयोजकांना देण्यात येईल.

तर, विवाहाचे स्थळ, वेळ, आयोजक आदी माहिती पोलिस संकलीत करतील. यामुळे आयोजकांना सर्व बाबी स्पष्ट होतील. यानंतर सुद्धा नियमभंग झाला तर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त पांडे यांनी दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com