आता दिल्लीसाठी दररोज विमानसेवा; हैदराबादसाठी सहा दिवस उड्डाण

आता दिल्लीसाठी दररोज विमानसेवा; हैदराबादसाठी सहा दिवस उड्डाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक - हैदराबाद विमानसेवा (Nashik - Hyderabad Airlines) शनिवार वगळता रोजच तर नाशिक- दिल्ली विमानसेवा (Nashik-Delhi Airlines) रोज उपलब्ध असणार आहे. हैदराबाद - नाशिक विमान हैदराबाद (Hyderabad) येथून सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी निघणार असून तेच विमान सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी ओझरहून (ozar) हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे.

नाशिक- हैदराबाद या विमानाची प्रवासी क्षमता 80 असून हा प्रवास 90 मिनिटांचा असेल. दिल्ली (delhi) - नाशिक (nashik) हे विमान सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण करणार असून, तेच विमान नाशिकहून दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण घेईल.

या विमानात 189 प्रवासी बसू शकतील. प्रवास दोन तासांचा राहणार आहे. करोनामुळे (corona) नाशिकच्या ओझर विमानतळावरून (Ozar Airport) वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची तयारी सुरू झाली असून नाशिक नाशिक-दिल्ली विमानसेवा चार ऑगस्टपासून तर नाशिक-हैदराबाद दि.22 जुलैपासून सुरु होणार आहे. ही विमानसेवा स्पाईस जेट कंपनीची (Spice Jet Company) राहणार आहे.

केंद्र शासनाच्या (central government) उडान-2 योजनेअंतर्गत नाशिक शहर (nashik city) देशभरातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जावे.यासाठी खा.हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते.खा.गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तीन वर्षांपूर्वी ओझर विमानतळावरून प्रवासी विमानसेवेला सुरुवात झाली होती. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी आणि उद्योजकांकडून या विमानसेवेला दोन वर्ष भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

करोनाच्या लॉकडाऊन काळात विमानसेवा बंद करण्यात आली होती. विमानसेवा बंद झाल्याने नाशिकसह धुळे (dhule), जळगाव (jalgaon) आणि अहमदनगर (Ahmednagar) येथील व्यापारी, उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक-दिल्ली, नाशिक-हैदराबाद विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी खा. गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले होते. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com