शहरासाठी आता रोज ५०० करोना चाचण्या

वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर करोना चाचण्यात वाढ
शहरासाठी आता रोज ५०० करोना चाचण्या
करोना बाधित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना विषाणुचा मोठा फटका आता नाशिक महापालिका क्षेत्राला बसु लागला असुन दररोज बाधीतांचा आकडा दीडशे ते पाऊणे दोनशेच्या दरम्यान वाढत आहे. त्याचबरोबर वृध्दांबरोबर कमी वयांच्या व्यक्तींचा मृत्यू होऊ लागला आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर करोना चाचण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.

मागील महिन्यात शहरातील संशयितांच्या दररोज २५० चाचण्या केल्या जात असल्याने स्वॅब नमुने प्रलंबीत राहण्याचे प्रमाण वाढले होते. याचमुळे आता महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांनी आता दररोज ५०० करोना चाचण्या व २०० अ‍ॅन्टीजेन चाचण्या केल्या जाणार आहे. परिणामी करोना संक्रमण रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

शहरातील जुलै महिन्यातील नऊ दिवसांचा रुग्णांचा व मृत्युचा वाढता आकडा नाशिककरांसाठी चिंतेचा बनला आहे. शहरात गेल्या ९ दिवसात १५०७ रुग्ण वाढले असुन ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दररोज दीडशे व पाऊणेदोनशे रुग्ण समोर येत आहे. यामुळे आता शहरातील महापालिका प्रशासनाने तयार केलेले कोरंटाईन कक्ष, कोविड केअर सेंटर व कोविड रुग्णालय यातील खाटा भरत चालल्या आहेत. तसेच बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले अतिजोखमीच्या व्यक्ती व संशयित वृध्द रुग्णांच्या चाचण्या प्रलंबीत राहत असल्याने संसर्ग होत असल्याने आता महापालिका प्रशासनाकडुन दररोज ५०० चाचण्या करण्याचा निर्णय घेत यासंदर्भातील तयारी पुण्याच्या प्रयोग शाळेकडुन करण्यात आली आहे.

तसेच नाशिक महापालिकेला आयएमसीआर कडुन अ‍ॅन्टीजेन टेस्ट करिता ९ हजार किट मिळाल्या असुन याद्वारे दररोज २०० चाण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे दररोज ७०० चाचण्या आता होणार आहे. महापालिका प्रशासनाकडुन प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. यात शहरातील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व सामाजिक अंतरांचे पालन करतांना मास्क व सॅनिटाइजर वापर करणे यासंदर्भात जनजागृती सुरू केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com