आता गवतापासून बनणार सीएनजी गॅस

आता गवतापासून बनणार सीएनजी गॅस

कळवण | प्रतिनिधी | Kalvan

आदिवासी बहुल भागात 10 एकर जागेत गिन्नी गवतापासून (Guinea grass) जैविक इंधन निर्मिती प्रकल्प (Bio Fuel Production Project) लवकरच सुरु होणार आहे....

यामुळे शेतकर्‍यांना (Farmer) हक्काची बाजारपेठ व स्थानिक ठिकाणी रोजगार (Employment) उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. या प्रकल्पात सीएनजी गॅस (CNG Gas) व घरगुती गॅस (Domestic Gas) निर्मिती होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. रवींद्र पवार (Dr. Ravindra Pagar) यांनी दिली.

मीरा क्लिनफ्यूल्स लिमिटेड कंपनी (Mira Cleanfuels Limited Company) अंतर्गत ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. (GREEN FARMER PRODUCER COMPANY LTD.) कळवण तालुक्यात (Kalvan Taluka) जैविक इंधन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.

या प्रकल्पबाबत तालुक्यातील शेतकर्‍यांना माहिती देण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी श्री पवार बोलत होते. प्रकल्प सहकारी संदीप जाधव, कृष्णाजी ठुबे, अनिल बच्छाव उपस्थित होते.

पवार म्हणाले की, सध्या देशाचा वीस टक्के खर्च हा बाहेरील देशातील इंधन आयात (Fuel Import) करण्यासाठी होत आहे. माजी राष्ट्रपती स्व. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Former President late. A. P. J. Abdul Kalam) यांनी आपल्या देशात नैसर्गिकरित्या इंधन तयार करण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाची (Bio Technology) संकल्पना पुढे आणली.

त्या माध्यमातून नैसर्गिक इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरु होत आहे. असाच प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात होत असून हा पहिला प्रकल्प आहे. माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची संकल्पना असणार्‍या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कळवण तालुक्यात सुमारे 50 कोटी रुपयांचा जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे.

या प्रकल्पामुळे कळवण तालुक्यातील शेतकर्‍यांचे आर्थिक हित साध्य होणार असून संपूर्ण कळवण तालुका प्रदूषणमुक्त (Pollution free) करून शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती (Organic farming) करण्याबरोबरच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी 10 हजार शेतकर्‍यांना नाममात्र शुल्क भरून सभासद करून घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी तालुक्यातून काँग्रेस तालुकाध्यक्ष महिंद्र हिरे, कृउबा संचालक मोहन जाधव, भरत शिंदे, पंडव बहिरम, आशुतोष आहेर, राजेंद्र आहेर, रमेश आहेर, भगवान देवरे, विशवनाथ थैल, रमेश वाघ, विनोद खैरणार, चंद्रकांत गवळी, डॉ. विवेकानंद नेहे, सचिन वाघ आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

थेट शेतात जाऊन मालाची खरेदी

शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला माल त्यांच्या शेतात जाऊन खरेदी करणार असल्याने शेतकर्‍यांना कोठेही गवत घेऊन जाण्याची गरज नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी प्रामुख्याने शेतकर्‍यांचा विचार करण्यात आला या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या इंधनाचा वाहनासाठी व घरगुती स्वयंपाकासाठी उपयोग होणार आहे. प्रकल्पाच्या एकूण नफ्यातील सुमारे 20 टक्के नफा हा तालुक्यातच सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे.

शेतकर्‍यांच्या कोणत्याच पिकाला हमीभाव नाही त्यामुळे पिकेल ते विकेलच असे नाही. शेतीला जोड धंदा आवश्यक आहे. त्याच्या एकूण शेती पैकी किमान एक एकर क्षेत्राचे उत्पन्नात दोन लाख वार्षिक उत्पन्न हमखास मिळणार असेल तर या प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे.

- भरत शिंदे, शेतकरी, हिंगवे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com