आता बोगस मतदार स्वत:हून नावे काढण्याच्या तयारीत

आता बोगस मतदार स्वत:हून नावे काढण्याच्या तयारीत

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

मतदार नोंदणी (Voter registration) अधिकारी 122, दिंडोरी (Dindori) (अ.ज) विधानसभा मतदार संघ (Assembly constituency) यांचेकडे मतदार यादीत मतदारांची दुबार नावे असल्याबाबत लेखी तक्रार चौकशीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer) यांचेकडून प्राप्त झालेली आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर सदर नावे दुबार आहेत किंवा कसे ? याबाबत पडताळणीचे कामकाज जिल्हातील सर्व पंधरा मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर सुरु आहे. याबाबत सर्व नागरिकांनी याकडे लक्ष देऊन आपले नाव दुबार आहे का? असेल तर एकच ठिकाणी ठेवन्याबाबत फॉर्म भरून नाव कमी करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर (Province Officer Dr. Sandeep Aher) यांनी केले आहे.

दरम्यान, बोगस मतदारांचे धाबे त्यामुळे दणाणले आहे. बोगस मतदार आता स्वत:हून नावे काढण्याच्या तयारीत लागले आहे. मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी नागरीक, राजकिय पक्ष यांच्या माहितीसाठी ज्या स्वरुपात प्राप्त झालेल्या आहेत तशा प्राप्त झालेल्या दुबार मतदारांच्या याद्या याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर नावे दुबार आहे किंवा कसे ? याबाबत स्वतःच्या नावांची अथवा अन्य नागरीक, स्वयंसेवी संस्था यांना खात्री करता यावी या दृष्टीने उपरोक्त दुबार मतदारांच्या याद्या www.nashikmitra.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. या याद्यांची यथोचित पडताळणी झाल्यानंतर विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन नावे वगळणीबाबत कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.

दि. 29 सप्टेंबर 2021 पासून दि.10 ऑक्टोबर 2021 पर्यंत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Polling center level officials) उपरोक्त यादीत नमुद मतदारांच्या रहिवासाच्या ठिकाणी भेट घेऊन घरोघर तपासणी करणार आहे. तपासणी दरम्यान सर्व मतदार (Voters), नागरीक (Citizen), राजकिय पक्ष (Political party) यांनी उपरोक्त यादीतील नावांची पडताळणी करुन जर मतदारांचे नाव दुबार नोंदवले गेले असल्यास ज्या ठिकाणी संबंधित मतदाराचा सर्वसाधारण रहिवास आहे.

त्या मतदारसंघातील मतदार यादीतील नाव कायम ठेवून दुसर्‍या मतदार संघातील नाव तातडीने वगळण्यात यावे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांकडे फॉर्म 7 भरुन देणे आवश्यक आहे. मतदार त्यांच्या नावाची खात्री हि www.nvsp.in या संकेत स्थळावर जावुन सुध्दा करु शकतात.

मतदारांना मतदान नोंदणी बाबत काही माहिती हवी असल्यास ते कार्यालयीन वेळेत टोलफ्री क्रमांक 1950 या तसेच संबंधित मतदान नोंदणी कार्यालय यांचे कार्यालयात संपर्क साधू शकतात. मतदार यादीत दुबार नाव नोंदविणे किंवा नाव नोंदणी करतांना चुकीचे माहिती सादर करणे हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 31 अन्वये शिक्षेस पात्र आहे.

ही बाब सर्व सबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे. सर्व नागरीक, स्वयंसेवी संस्था, मिडीया, लोकप्रतिनीधी व प्रशासन मिळून आपण मतदार याद्या अद्यावत व अचूक राखण्याचे कर्तव्य पार पाडू या असे आवाहन डॉ. संदीप आहेर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.