आता 'या' विभागात 'बायोमॅट्रीक' हजेरी बंधनकारक

आता 'या' विभागात 'बायोमॅट्रीक' हजेरी बंधनकारक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आरोग्य केंद्रात (Health Center) डॉक्टर (doctor) आणि नर्स (Nurse) हजर नसल्याने एका आईलाच मुलीची प्रसूती करावी लागली.

या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद (zilha parishad) आरोग्य विभागाकडून (Department of Health) त्रीसदस्यीय समिती गठीत केली असुन संबंधीत डॉक्टरांवर निलंबनाबाबचा प्रस्ताव पाठवीण्यात आला आहे.

तसेच या पुढे बायोमॅट्रीक हजेरी (Biometric attendance) बंधनकारक केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधीकारी अशीमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal) यांंनी जाहीर केले आहे.

नाशिकच्या (nashik) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) बरड्याचीवाडी गावातील महिला प्रसूतीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Anjaneri Primary Health Center) दाखल झाली होती. मात्र या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक नसल्याने सोनाबाई आव्हाटेंनी मुलीची प्रसूती केल्याचे म्हटलें.

आरोग्य केंद्रावर भोंगळ कारभाराचा आरोप सुरु झाले होते. आज त्याबात वृत प्रसिध्द् होताच जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. हर्षल नेहते (District Health Officer Dr. Harshal Nehte) यानी तातडीने अंंजनेरी प्राथमीक आराग्ेय केद्रात भेट देऊन चौकशी केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधीकारी मित्तल यांनी सदर घटने बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करुन या पुढे असा हलगर्जी पणा कदापी सहन केला जाणार नाही असे स्पष्ट केले.

तर दुसरीकडे हे आरोप आरोग्य सेविकेने फेटाळले. आता या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून समिती गठीत केली आहे.तसेच येथे बरेच कर्मचारी कमी आहेत ते भरले जाणार आहे. बायोमॅटीर्क हजेरी सर्वत्र बंधनकरक करण्याचा जिल्हा परीषदेचा प्रयत्न राहणार आहे अंजनेरी घटने नंतर आरोग्य विभागातील गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याने आता काही दिवस हे खाते चर्चेत राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com