सुरत-चेन्नई महामार्गासाठी अधिसूचना

लेखी हरकती नोंदवण्याचे प्रशासनाचे आवाहन
सुरत-चेन्नई महामार्गासाठी अधिसूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

समृद्धी महामार्गानंतर नाशिकच्या दळणवळणाला बूस्ट देण्यात हातभार लागणार्‍या भारतमालांतर्गत Bharatmala ‘ग्रीनफिल्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार सुरत-चेन्नई हा ग्रीनफिल्ड महामार्ग Surat-Chennai Greenfield Highway नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी land acquisition process रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे The Ministry of Road Transport and Highways has issued the notification . याबाबत हरकती असल्यास 21 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील 609 गावांमधून जाणार्‍या या महामार्गासाठी 996 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

नाशिक-सुरत अवघे 176 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल. 2022 पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे 2024 मध्ये हा महामार्ग खुला करण्याचे नियोजन आहे. या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे एक हजार 600 किलोमीटरचे अंतर एक हजार 250 किलोमीटरवर येणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. हैदराबाद येथील आर्वी असोसिएट्स आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रा.लि. या कंपनीला रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.

‘ग्रीनफिल्ड’ प्रकल्प दीड वर्षात जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. अधिग्रहणानंतर पुढील तीन वर्षांत हायवे कार्यान्वित होणार आहे. नाशिक जिल्ह्यात 122 किलोमीटर अंतर असून, त्यासाठी 997 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नरमधून जाणार आहे. त्यात 69 गावांचा समावेश असून दिंडोरीतील सर्वाधिक 23 गावांचा समावेश आहे.

सिन्नरमधील वावी येथे ‘समृद्धी’ एक्स्प्रेसला तो छेदणार आहे. नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यांत प्रकल्पाची उभारणी असणार आहे. राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेश होऊन अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे राज्यातील शेवटचे टोक असणार आहे. यामुळे नाशिक ते सोलापूर अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे.

सुरत-चेन्नई महामार्ग जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक, सिन्नरसह काही तालुक्यांमधून जाणार आहे. साधारणतः 52 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग जिल्ह्यातून जात आहे. महामार्गाच्या बांधणीसाठी सरकारला जमिनीची आवश्यकता आहे. दिंडोरी तालुक्यात जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करता यावी, यासाठी प्रशासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तालुक्यातील आंबेगण, चाचडगाव, चिल्हारपाडा, ढकांबे, धाऊर, गांडोले, गोळशी, इंदोरे, जांबुटके, कवडासर, महाजे, नाळेगाव, ननाशी, पिंपळणारे, रडतोंडी, रामशेज, रासेगाव, शिवनई, टेटमाळ, उमराळे बुद्रुक, वरवंडी, झारलीपाडा,पेठ तालुक्यातील हरणगाव, कळमबारी, पाहुचीबारी, वडबारी, विरमळ या गावांमधील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे.

याबाबत कुणाला आक्षेप असल्यास तो लेखी स्वरूपात 21 दिवसांच्या आत दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आक्षेप घेणार्या व्यक्तीला स्वतःला किंवा वकिलामार्फत म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. पूर्ण बाजू ऐकून घेतल्यानंतरच आक्षेप स्वीकारायचा की नाकारायचा, याचा निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com