लोहशिंगवे-वंजारवाडी शेतकर्‍यांना नोटिसा
नाशिक

लोहशिंगवे-वंजारवाडी शेतकर्‍यांना नोटिसा

प्रस्तावित लोहमार्गाच्या जमीन अधिग्रहणासाठी

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । प्रतिनिधी

इगतपुरी ते मनमाड दरम्यान असणार्‍या लोहमार्ग हा दोन पदरी असल्याने आगामी काळात या मार्गाचे विस्तारीकरणाच्या प्रकल्पासाठी नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे व वंजारवाडी या दोन गावातील शेतकर्‍यांना जमीन अधिग्रहणाबाबत नोटीसा देण्यात आल्या आहे. दरम्यान येथील शेतकर्‍यांमध्ये या रेल्वेमार्गाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

गेल्या पाच वर्षापूर्वी शासन निर्णय ठराव क्रमांक संकीर्ण 03/2015/ प्रा.क्र.34/अ-2 प्रमाणे इगतपुरी ते मनमाड रेल्वेमार्ग रुंदीकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 2017 साली काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार खासगी क्षेत्रातील जमीन या रुंदिकरणासाठी खासगी वाटाघाटी पद्धतीने थेट खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी करताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन विभागाकडून बाधित शेतकर्‍यांना वाजवी दर मिळण्याबाबतचा मोबदला निश्चित करण्यात येणार आहे.

भूसंपादन विभागकडून जाहीर केलेल्या नोटिसामध्ये शेतकर्‍यांचे नाव, गट क्रमांक व संपादित कारवायाच्या क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत असलेल्या हरकती शासनाकडून नोटीस मागविण्यात आल्या असून सध्यस्थितीत इगतपुरी -मनमाड या रेल्वेमार्गालगतचे सोडून इतरही शेतकर्‍यांचे नाव व क्षेत्र नमूद करण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाकडून होणारा मार्ग निश्चित कुठून जाणार आहे याबाबत संभ्रम शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला आहे. नमूद नोटिसी मध्ये दोन्ही गावाचे मिळून 60 शेतकर्‍यांची 32 हेक्टर जमीन अधिग्रहण होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com