
नाशिक । प्रतिनिधी Nashik
गोदापात्रातील (Godavari River )पाणवेली स्वच्छता ( Weeds )करण्यास नकारघंटा वाजवल्याने आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घनकचरा संकलन विभागाला ( Solid waste collection department)नोटीस बजावल्याचे समजते. तुमचेे निलंबन का करु नये, असा जाब विचारण्यात आल्याचे कळते.
गोदापात्रातील पाणीवेली ही मोठी समस्या ठरत आहे. त्यामुळे नदीचे मोठे प्रदूषण होत आहे. पाणवेली स्वच्छता मोहीमेची जबाबदारी ही गोदावरी संवर्धन विभागाची आहे. पण मनुष्यबळ कमतरते अभावी ही मोहीम त्यांना राबचणे शक्य नव्हते. त्यामुळे घनकचरा संकलन विभागाने पाणवेली काढण्याची मोहीम राबवावी अशा सूचना मनपा आयुक्तांनी केली होती, असे सांगितले जात आहे.
घनकचरा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याने त्यांना ही मोहीम राबवणे शक्य होते. ट्रॅश स्किमर मशीनद्वारे पाणवेली काढल्या जाणार होत्या. पण ही मशीन नादुरुस्त आहे. पाणवेली काढण्याची जबाबदारी गोदा संवर्धन विभागाची आहे. त्यांनी नदीपात्रातून पाणवेली काढल्यानंतर घनकचरा विभाग घंटागाडीद्वारे पाणवेलींचे संकलन करेल, असे उत्तर दिले गेले.