चार खासगी रुग्णालयांना नोटीसा

करोना रुग्णांची देयके तपासणीसाठी न दिल्याचा ठपका
चार खासगी रुग्णालयांना नोटीसा
USER

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील 4 खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या 80टक्के बेड वरील करोना रुग्णांची देयके नियुक्त लेखा परीक्षकांना तपासणीसाठी न दिल्याने व मनपाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य लेखा परीक्षक बी.जे. सोनकांबळे यांनी दिली.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेडवर कोरोनाचे रुग्ण दाखल झाल्यानंतर त्या रुग्णांना डिस्चार्ज होण्याच्या वेळी खाजगी रुग्णालयांनी शासन दराने देयके आकारणी केली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रुग्णालय निहाय लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्या लेखा परिक्षकांकडे 1 एप्रिल 2021 पासून अद्याप देयके तपासणीसाठी न दिल्याची तक्रार नियुक्त लेखापरीक्षकांकडून प्राप्त झाली होती.

त्या अनुषंगाने त्या खासगी रुग्णालयांची पाहणी मुख्य लेखा परिक्षक यांच्यासह पथकाने केली असता मनपाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन केलेले नसल्याचे आढळून आले.तसेच दर्शनी भागात लेखापरीक्षकांची नाव व मोबाईल नंबरचा फलक लावलेला नाही अश्या स्वरूपाच्या नियमांचे पालन न केल्याने शहरातील रामालयम हॉस्पिटल, मानस हॉस्पिटल, साईनाथ हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल या 4 रुग्णालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत

1 एप्रिल 2021 पासून दि.23 एप्रिल 2021 पर्यंतची 80टक्के बेड वरील करोना रुग्णांची देयके 3 दिवसात तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी असे त्यामध्ये नमूद केले असून ती उपलब्ध न करून दिल्यास रुग्णालय व्यवस्थापन विरुद्ध साथरोग अधिनियम 1857, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005,महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखा परिक्षक बी.जे सोनकांबळे यांनी दिली .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com