टॉवर नसलेल्या घरावर वसुलीसाठी जप्तीची नोटीस

टॉवर नसलेल्या घरावर वसुलीसाठी जप्तीची नोटीस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मिळकत आपली नाहीच आणि लाखो रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस आली, स्वत:च्या मालकीचे चुंचाळे (Chunchale )येथील घर आणि कार्यालय सोडले तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मिळकत नाही. मात्र, महापालिकेने (NMC )त्यांची मिळकत तर शोधली आणि त्यावर टॉवरही(Tower ) दाखवल्याने आरोटे यांना धक्का बसला आहे. नसलेल्या घराचा शोध लावत मनपाने वसुलीचे आकडे तर वाढवले नाहीत, असा आरोप आरोटे यांनी केला आहे.

नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना अशाच प्रकारे त्यांच्या मिळकतीवर मोबाईल टॉवर नसताना चक्क या टॉवरच्या थकबाकीपोटी 13 लाख 25 हजार रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस बजावली आहे. ही रक्कम न भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याने आरोटे चक्रावले असून त्यांनी प्रशासनाला विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे देता येत नसल्याने ते वैतागले आहेत.

महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी वेगवेगळे केलेले प्रयोग अंगाशी येत आहेत. महापालिकेने घरपट्टीसंदर्भात सॉफ्टवेअर तयार केले असून त्यात इंडेक्स नंबर आणि अन्य तपशील असतो. घरपट्टी थकबाकीसाठी अलीकडे तर एसएमएस किंवा व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज देण्याचा फंडाही सुरू केला आहे. मात्र, अचूकता नसल्याने त्यातही गोंधळ होत आहेत. दोन दिवसांपूर्वी चुंचाळे येथील माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना महापालिकेने त्यांच्या मिळकतीवर असलेल्या मोबाईल टॉवरची भरपाई करण्यासाठी नोटीस बजावली असून 13 लाख 25 हजार 808 रुपये भरण्यास सांगितले आहे. ही रक्कम न भरल्यास मिळकत जप्त करण्याचा इशारा दिला आहे.

त्यांनी सिडकोचे विभागीय कार्यालय तसेच महापालिकेतही चौकशी केली. मात्र, त्यांनाही गोंधळाचे निराकरण करता आले नाही.

13 लाख रुपयांची नोटीस बघून सर्वसामान्यांना हृदयविकाराचा धक्काच बसू शकतो. अशाप्रकारे कारभार असेल तर नागरिक कशी काय घरपट्टी भरतील. उलट थकबाकीचे आकडे वाढतील.

- भागवत आरोटे, माजी नगरसेवक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com