बिऱ्हाड आंदोलनाची दखल; जिल्हा बँकेने मागविली 'ही' माहिती

बिऱ्हाड आंदोलनाची दखल; जिल्हा बँकेने मागविली 'ही' माहिती

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (swabhimani shetkari sanghatna) माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बिऱ्हाड आंदोलन (agitation) मोर्चाची दखल जिल्हा बँकेने (district bank) घेतली असून

यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थांकडून सर्व प्रकारच्या थकबाकीदार सभासदांची मुद्दल अधिक व्याजाची सहा, सात व आठ टक्क्यांपर्यंत सरळव्याज आकारणी करुन याबाबतची सविस्तर माहिती तात्काळ दोन दिवसांत पाठवा. असे आदेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (District Central Cooperative Bank) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेचे निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी सर्व विभाग व विभागीय अधिकारी सर्व विभाग यांना दिले आहेत.

जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या (farmers) जमिनीची लिलाव प्रक्रिया (Auction process) सुरू केलेली आहे. याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.16 ) मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री भुसे, माजी खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयात थकबाकीदार सभासदांची बैठक झाली.

बैठकीमध्ये थकबाकीदार सभासदांच्या कर्ज वसुलीसाठी (Debt recovery) व्याजाच्या संदर्भात चर्चा झाली. त्या चर्चे दरम्यान थकबाकीदार सभासदांना संस्था / बँक आकारणी करीत असलेला व्याजदर मान्य नसल्याने चर्चेदरम्यान थकबाकीदार सभासदांचे थकीत बाकीवर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दरम्यान व्याज सवलत मिळणेची मागणी केली. या अनुषंगाने पालकमंत्री भुसे यांनी थकबाकीदार सभासदावर ६ टक्के , ७ टक्के व ८ टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करुन तशी माहिती मागविली आहे.

या मागणीनुसार जिल्हा बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाभरातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी संस्थांना पत्र देत त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश काढले आहेत. पत्रासोबत नमुना देत, त्या नमुन्यात थकबाकीदार अन त्यांच्याकडील थकबाकी, सरळव्याज आदींचा समावेश आहे. ही माहिती एकत्रित करून राज्य शासनाला सादर केली जाणार आहे.राज्य शासनाकडून याबाबत काय निर्णय होतो याकडे थकबाकीदार सभासदांचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com