शासनाकडून शेतकर्‍यांना ठेंगा

स्वाभिमानीचे प्रा. जगताप यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
शासनाकडून शेतकर्‍यांना ठेंगा
USER

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Malegaon

दसरा मेळाव्याला (Dussehra Gathering) मुंबईत (mumbai) गर्दी करून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांनी एसटी महामंडळाला (ST Corporation) 10 कोटी रुपये दिले.

त्याचप्रमाणे कार्यकर्ते जमविण्यासाठी व मुंबईला आणण्यासाठी खासगी वाहतूक कंपन्याच्या (Private transport companies) बसेस, बंदोबस्त, अनेक कार्यकर्त्यांना खासगी वाहने दिली. बीकेसी मैदानावर (BKC Ground) कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला. केवळ राजकीय कुरघोडी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहे.

परंतु हाडाचे काडं करून, काबाड कष्ट करून, पोटाला पीळ देऊन नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना (farmers) प्रोत्साहनपर अनुदान (subsidy) म्हणून 50 हजार रुपये द्यायला मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही. हे या महाराष्ट्राचे दुदैव आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न आम्हाला पडतो अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संदीप जगताप (State President of Swabhimani Farmers Association Prof. Sandeep Jagtap) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

मुबई (mumbai) येथील केबीसी मैदानावर झालेल्या मेळाव्यासाठीचा प्रचंड खर्च म्हणजे बौद्धिक आणि आर्थिक दिवाळखोरीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. महाराष्ट्रात सरकार चार महिने होत आले. पावसाने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला. शेतकरी वर्गाचे अतोनात हाल झाले आणि अजूनही होत आहे. असे असताना शासनकर्ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात दंग आहेत. त्यांना सामान्य शेतकरी वर्गाची होरपळ का दिसत नाही.

सामान्य जनतेचे कितीतरी प्रश्न आजूनही अनुत्तरीत आहेत. ते सोडविणे शासनकर्त्यांचे प्रथम कर्तव्य असतानाही त्याच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा जातो आहे. त्यांच्या डोळ्यावर मस्तवाल सत्तेची धुंदी चढली आहेत. ती धुंदी भविष्यातील निडणुकामंध्ये सामान्य जनता उतरविल्या शिवाय राहणार नाही असेही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संदीप जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com