नाशिकरोड येथील नोट प्रेस ३० एप्रिल पर्यंत बंद

नाशिकरोड येथील नोट प्रेस ३० एप्रिल पर्यंत बंद

नाशिकरोड | Nashikroad

करोनामुळे नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस हे येत्या ३० एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चा संसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 14 एप्रिल पासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. दोन्ही प्रेस मध्ये सुमारे दोन हजाराहून अधिक कामगार आहे.

प्रेस मध्ये करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही प्रेस 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवावे अशी मागणी मजदूर संघाच्या वतीने प्रेस व्यवस्थापनाकडे करण्यात आली होती.

सदरची मागणी मंजूर झाले असून आज दिनांक पंधरा पासून रात्रपाळी पासूनच काम बंद ठेवण्यात येत आहे दरम्यान अत्यावश्यक कामासाठी प्रेसचे कामकाज सुरू राहणार असल्याचे गोडसे व जुंद्रे यांनी सांगितले.

दोन्ही प्रेस साधारण तीन मे पासून सुरू होतील कारण 1 मे रोजी कामगार दिनाची सुट्टी असेल व दिनांक दोन रोजी रविवार असल्याने त्या दिवशी कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवार दिनांक तीन मे पासून पुना प्रेसचे कामकाज सुरळीत चालू होईल

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com