कांदा आंदोलनाकडे दूर्लक्ष दूर्दैवी : बोराडे

कांदा उत्पादक
कांदा उत्पादक

कसबे सुकेणे। वार्ताहर | Kasbe Sukene

कांदा उत्पादक (Onion grower) शेतकर्‍यांचे (farmres) चालू वर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान (financial loss) झाले असून

कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरून जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हा शेतकरी संघटनेकडून (District Farmers Association) आंदोलने (agitation) केली जात आहे. मात्र या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नसल्याचे मोठे दुदैव असल्याचे मत स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे (Arjun Borade, District President of Farmers Association) यांनी व्यक्त केले आहे.

चालू वर्षी जिल्ह्यात कांद्याच्या (onion) मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्याने कांदा उत्पादन वाढले. मात्र सुरुवातीपासूनच कांद्याच्या दराबाबत राज्य व केंद्र सरकारचे (central government) धोरण उदासीन असल्याने कांद्याचे भाव सुरुवातीपासूनच एक हजार रुपयांपेक्षा कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याची साठवणूक केली. टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करत असतानाही कांद्याचे भाव वाढलेले नाही उलट चाळीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांची पुरती वाट लागली आहे.

जिल्हा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कांदा उत्पादक (Onion grower) तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन (agitation) करूनही सरकार बघ्याची भूमिका घेते. लोकप्रतिनिधीही सरकारवर दबाव टाकत नाही. शेतकर्‍यांना कोणी वाली उरले नाही अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेबरोबर रस्त्यावर उतरून व्यापक स्वरूपात आंदोलन करणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या (election) वेळेस शेतकर्‍यांप्रती कळवळा दाखविणारे नेते निवडून गेल्यानंतर मात्र शेतकर्‍यांच्या प्रश्नावर अवाक्षरही बोलत नाही. आज खते, बियाणे, औषधे यांचे भाव गगनाला भिडले आहे. तर शेतीमालाचे भाव कोसळत आहे.

हा विरोधाभास असून यामुळे शेतकर्‍याची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा कसमादे पट्टयातील टेहरे येथे कांदा उत्पादक शेतकरी (farmers) मोठे आंदोलन करत असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीमागे स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना खंबीरपणे उभी असून शेतकर्‍यांची साथ शेतकरी संघटनेला महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी केले आहे. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण बोंबले यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com