नाशिक । प्रतिनिधी

मागील दोन दिवस मालेगाव,सटाणा आणि नांदगाव तालुक्यातील ५१ गावांना गारपीटीने झोडपले. ८ हजार २७९ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला,कडधांन्य व फळपिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात मागील १० दिवसात जवळपास १३ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके अवकाळीने आडवी झाली आहेत...

राज्यासह जिल्ह्याला अवकाळी पाउस व गारपिटिचा तडाखा बसला आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीटीने ५ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील गहू, मका पिकांसह उन्हाळी कांदा आदी पिकांना जोरदार तडाखा दिला.

या नुकसानीचे पंचनामे सुरु असतांना सलग दोन दिवसांपासून मालेगाव,सटाणा आणि नांदगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने जिल्हयातील रब्बी हंगामातील गहू, मका, बाजरी, हरभरा, भुईमुग व ऊस पिकांसह बहु-वार्षिक फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

उन्हाळी काद्यांचे मोठी हानी झाली आहे.जिल्हयातील तब्बल ५ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावरील कांद्याला अवकाळीचा तडाखा बसला आहे. एकूण ५१ गावातील ११ हजार ९५३ शेतकर्यांच्या ८ हजार २७९ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे.

तर, वीज पडून चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील पंढरीनाथ मुरलीधर मोरे यांची गाय मयत झाली आहे. गेल्या सप्ताहात शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीच्या नुकसानीनंतर झालेल्या या नुकसानीने शेतकर्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान प्रशासनाकडून नूकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु अाहे.