शिक्षकेत्तर आकृतिबंध रद्द करावा, अन्यथा आत्महत्त्या करण्याची परवानगी द्या : नाडगौडा

शिक्षकेत्तर आकृतिबंध रद्द करावा, अन्यथा आत्महत्त्या करण्याची परवानगी द्या : नाडगौडा
USER

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी) :

शिक्षकेतर आकृतिबंध रद्द करावा, अन्यथा आत्महत्त्या करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष सतीश नाडगौडा यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी विशेष पत्र लिहून पत्रकारांना माहिती दिली. आपल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या आजच्या महाविकास आघाडी शासनाने आपल्या पूर्वीच्याच आघाडी शासनाच्या १९९९ ते २०१४ या काळातील सचिवांनी एकतर्फी प्रस्तावित करून,

विधीमंडळ व न्यायालयीन निर्देशांना डावलून, मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षकेतर पदांकरिताचा अन्यायकारक आकृतिबंध लादला असून जुलमी अंमलबजावणी सुरू केली असून, मूळ शिफारस व प्रस्तावात नसलेली कर्मचारी वर्ग ४ची पद कंत्राटी पध्दतीने मानधनावर भरण्याचा अव्यवहार्य निर्णय घेतला.

त्यामुळे विद्यमान कार्यरत व्यक्तिंवर परिणाम होत नसल्याने, संघटनात्मक पातळीवर न्यायालयीन प्रक्रीया करता येऊ शकत नाही. असे म्हटले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com