शहराच्या 'या' विभागात आज पाणीबाणी

शहराच्या 'या' विभागात आज पाणीबाणी

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

नाशिक मनपाचे ( NMC ) पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र (Panchvati Water Purification Centre) येथील आरपी विद्यालय/हनुमानवाडी जलकुंभ भरणेसाठी जुनी पंपींग मशिनरी बदलून नवीन पंपींग मशिनरी बसविणेचे काम करावयाचे असल्याने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील सदर जलकुंभाचे पंपींग 17 सप्टेंबरला बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पंचवटी परिसरातील सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.

प्रोफेसर कॉलनी, मोरे मळा, हनुमानवाडी क्रांतीनगर, कृष्णनगर, शिंदे नगर, जाणता राजा कॉलनी, जगझाप मार्ग, जाधव कॉलनी, मधुबन कॉलनी, नाग चौक, गजानन कॉलनी, सितागुंफा, सरदार चौक, सुकेणकर लेन, ढिकलेनगर, गुरुद्वारा रोड, निमाणी बस स्टॅण्ड, वाल्मिकनगर, संजयनगर, बुरडवाडी, वाघाडी परिसर, आरपी विदयालय परिसर, श्रीराम विदयालय परिसर इ. ठिकाणचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच दि. 18 रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, असे मनपा कार्यकारी अभियंता यांनी कळवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com