शहराच्या 'या' विभागात उद्या पाणीबाणी

शहराच्या 'या' विभागात उद्या पाणीबाणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंचवटी विभागाअंतर्गत ( Panchavati Division ) पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र ( Panchavati Water Filtration Plant ) येथील 30 लक्ष लिटर्स क्षमतेच्या जलकुंभाचे उर्ध्ववाहिनीवर जोडणीचे काम करायचे आहे. हे काम शुक्रवार (दि.10) हाती घेण्यात येणार आहे. या जलकुंभावरुन रामवाडी जलकुंभ भरणा होतो. त्यामुळे या जलकुंभावरुन पाणी पुरवठा होणार्‍या परिसरात उद्या शुक्रवारी पाणी पुरवठा ( Water Supply )होणार नाही.

प्रभाग क्र.6 मधील रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्यानगर, बुरकुलेनगर, कोठारवाडी, रामनगर, बच्छाव हॉस्पीटल परिसर, कलाआई मंदिर परिसर, नागरे मळा, क्रांतीनगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनी काही भाग, मोरे मळा काही भाग, तुळजाभवानी नगर, रामकृष्णनगर, भावबंधन मंगल कार्यालयाजवळील काही भाग इत्यादी परिसरात तसेच प्र क्र. 5 मधील दत्तनगर, कुमावत नगर, शिंदेनगर, नवनाथनगर, द्रोणागिरी, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, जाणता राजा कॉलनी, भन्साळी मळा, रोहिणी नगर, नवरंग मंगल कार्यालय परिसर,

पेठ नाका व मखमलाबाद नाका परिसर, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड व चिंचबन परिसर तसेच प्र क्र. 4 मधील पेठ रोड कॅनॉललगतचा परिसर, हरीओमनगर, पेठरोड वजनकाटा जवळील परिसर, फुलेनगर परिसर, विजय चौक, राहूलवाडी, भराडवाडी, लक्ष्मणनगर, वडारवाडी, पेठ रोडवरील शनी मंदिरासमोरील परिसर, दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकीजमागिल रामनगर परिसर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज सोसा ते युनियन बँक ते निमाणी पर्यंतचा परिसर आदी ठिकाणी शुक्रवारचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. शनिवार (दि.11) रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, असे नाशिक मनपाकडून कळवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com