एकही ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये

एकही ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात लसीकरणाचे (Vaccination) उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीने 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत 'मिशन कवच कुंडल’ (Mission Kavach Kundal) मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या मोहिमेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी सर्व यंत्रणांनी गावपातळीवर लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन (micro planning) करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी आज बैठकीत दिल्या आहेत. जिल्हाधिकारी सभागृह येथे आयोजित कोविड-19 लसीकरण (corona vaccination) जिल्हा कृतिदल समिती बैठकीत (district task force committee meeting) ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी भूसंपादन गणेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शैलेश निकम, नाशिक महानगरपालिकेच्या (nashik municipal corporation) माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अजिता साळुंखे, महानगरपालिका मालेगाव माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अलका भावसार, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर, जिल्हा क्रिडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रिडा अधिकारी महेश पाटील, आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, मिशन कवच कुंडल मोहिमेसाठी वेळेची मर्यादा लक्षात घेता अजून तीन दिवस हातात आहेत. आज येवला, सिन्नर (sinnar) व निफाड (niphad) या तालुक्यांत रूग्णसंख्या वाढलेली आहे. या तिन्ही तालुक्यात व त्यांच्या सिमेवरील 14 गांवामध्ये लसीकरणाचे कॅम्पस आयोजित केल्यास निश्चितच त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. मालेगाव (malegaon) शहरात लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी लसीकरणाबाबत स्थानिक प्रशासनाने व्यापक जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. माढंरे पुढे म्हणाले की, नवरात्र उत्सव (navaratrotsav) जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. सप्तशृंगी गड वणी, चांदवड (chandwad), इगतपुरी (igatpuri) व ज्या ठिकाणी देवींची शक्तीपीठे आहे, अशा ठिकाणी लसीकरण झालेल्या व्यक्तींना ऑनलाईन दर्शनाची (online darshan) व्यवस्था केली आहे. परंतु इतर ठिकाणाहून आलेले लोक त्याठिकाणी केवळ दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे व त्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घ्यावी, असेही श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले आहे. उद्दीष्टपूर्तीच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजनबध्द लसीकरण कार्यक्रम आखून प्रयत्न करावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.